Type Here to Get Search Results !

कनिष्ठ महाविद्यालय प्रलंबित प्रश्न लवकरच सोडवले जातील- औदुंबर उकिरडे

भंडारदरा प्रतिनिधी ,नामदेव बांगर 
भंडरदरा : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारती संघटना पुणे विभाग यांच्या वतीने शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा केली असता पुणे विभागीय उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रश्न लवकरच सोडवले जातील असे संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, जिल्हाकोषाध्यक्ष सुनील साबळे, सचिव महेश पाडेकर, योगेश उगले आदि पदाधिकारी यांना आश्वासन दिले गेल्या अनेक दिवसांपासून पुणे विभागीय कार्यालयात  पूर्णवेळ शिक्षण उपसंचालक नव्हते त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न ऐरणीवर होते त्यात शालार्थ आयडी, नियमित मान्यता विनाअनुदानित वरून अनुदानित बदली मान्यता, सातवा वेतन आयोग वेतन निश्चिती, सहावा वेतन व सातवा वेतन आयोग फरक हप्ते, वैद्यकीय बीले प्रतिपूर्ती लवकरच व्हावी, एक तारखेला पगार व्हावे अशा विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली असता पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच प्रलंबित प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन दिले शिक्षक भारती संघटनेचे पदाधिकारी राज्य सचिव सुनील गाडगे शिक्षक भरती संघटनेचे कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, सल्लागार कैलास राहणे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन जासूद, तालुका अध्यक्ष संजय तमनर, शाम जगताप रोहिदास चव्हाण, प्रवीण मते, हर्षल खंडीझोड ,सचिन लगड विनाअनुदान विरोधी संघर्ष समितीचे दिनेश शेळके, रूपाली कुरुंमकर, माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप ,सचिव विजय कराळे , उर्दु विभाग जिल्हाध्यक्ष मोहम्मद सामी शेख,संभाजी पवार,बाबासाहेब लोंढे,सुदाम दिघे,हनुमंत रायकर,संभाजी पवार,कैलास जाधव,नवनाथ घोरपडे,किसन सोनवणे,सिकंदर शेख,अशोक अन्हाट,संभाजी चौधरी,,श्रीकांत गाडगे,सुर्यकांत बांदल, जॉन सोनवणे,बाळासाहेब शिंदे, रेवन घंगाळे, प्रशांत कुलकर्णी, एम पी शिर्के,हनुमंत बोरुडे,सोमनाथ बोंतले,प्रकाश मिंड,मधुकर नागवडे,महादेव कोठारे,संतोष देशमुख,योगेश कराळे, काशीनाथ मते आदि सर्व जिल्हा तालुका पदाधिकारी शिक्षक भारती संघटना अहमदनगर आदीनी संघटनेच्या वतीने विभागीय उपसंचालक यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.