गणेशोत्सव म्हणजे सामाजिक प्रबोधनाचे एक चांगले व्यासपीठ आहे.१८९३ च्या मुंबई आणि पुण्यातील हिंदू-मुस्लिम दंगलीमध्ये सरकारने मुस्लिमांची बाजु घेतली असे त्यांचे स्पष्ट मत होते व त्या पार्श्वभूमीवर हिंदूना एकत्रित करणे त्यांना गरजेचे वाटत होते.इंग्रजांना राजकीय बैठकीचा विरोध होता धर्माच्या बाबतीत ते दोन हात दूर राहणे पसंत करत याचा फायदा टिळकांनी गणेशोत्सवाच्या पुनरुज्जीवनसाठी करून घेतला थोड्याच अवधीत गणेशोत्सव सर्वदुर पोहचला व अनेक लहान-मोठी सार्वजनिक गणेश मंडळे स्थापित झाली.श्री गणेश चतुर्थी पासून गणेशोत्सवाला सुरुवात होते.
लोकमान्य टिळक : गणेशोत्सव
August 22, 2020
0
लोकमान्य टिळकांनी १८९४ साली विंचूरकर वाड्यात गणेशोत्सवाला सुरुवात केली. त्यांचा उद्देश स्वातंत्र्यासाठी लोकांनी एकत्रित यावे हा होता. हिंदूधर्मा मधील लोकांनच्या घराघरात गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात होता पण टिळकांनी त्याला दहा दिवस चालणारा सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले. त्यामागे त्यांचे दोनच उद्देश होते,एक म्हणजे या उत्सवाच्या निमित्ताने ब्रिटिश विरोधी मतप्रचार करणे. तर दुसरा उद्देश म्हणजे हिंदू समाज जवळ आणणे त्यांच्यातील एकोपा वाढवणे हा होता.
Tags
