भंडारदरा प्रतिनीधी
नामदेव बांगर
भंडारदरा :अकोले तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी विविध भागामध्ये ५० पेक्षा अधिक टॉवरची उभारणी करण्यात आलेली आहे. मात्र सध्या स्थितीला शेंडी, भंडारदरा, राजूर, खिरविरे, वारघुशी, शेलविरे इत्यादी ठिकाणचे टॉवर चालू आहेत. तीन वर्षांपासून देवगाव, शेणित, बारी, येथे टॉवर उभारण्यात आले आहेत. मात्र अद्यापपर्यंत टॉवर चालू करण्यात आलेले नाहीत. यामुळे नागरिकांना नेटवर्कच्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे. भारतामध्ये कोरोना रोगाने थौमान माजविले आहे. गेल्या पाच महिण्यांपासून शाळा महाविद्यालये बंद आहेत.
सरकारने ऑनलाईन शिक्षण व्यवस्थेवर भर दिलेला आहे. अकोले तालुक्यातील बहुतांश ठिकाणी नेटवर्कच उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत असतात. लवकरात लवकर टॉवर चालू करावेत अशी नागरिकांचे म्हणने आहे. गेल्या तीन वर्षांपासून तालुक्याच्या विविध भागामध्ये टॉवर उभारण्यात आले आहेत. टॉवरचे उभारण्याचे सर्व कामे झाले आहेत. जनरेटर, विद्यूत महामंडाळाकडून कनेक्शन आदी सर्व पूर्ण झाले आहेत. फक्त टॉवर चालू करण्याचेच काम बाकी असतांना नागरिकांना नेटवर्कची प्रतिक्षाच करावी लागत आहे. शाळा महाविद्यालयाचे प्रवेश फॉर्म, नोकरीविषयक अर्ज, लाईट बिल हे सर्व कामे करण्यासाठी नागरिकांना शेंडी-भंडारदरा, राजूर, अकोले याठिकाणी जावे लागते आहे.
देवगाव येथे देवराम भांगरे यांच्या जागेत २०१७ साली जीवोचे टॉवर उभारण्यात आले आहे. मात्र गेल्या एका वर्षभरापासून कंपनीने टॉवरच्या जागेचे भाड्डे थकविले आहे. त्यांना कंपनीने पत्र पाठविले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे, “आम्ही आपल्याला हे सांगू इच्छितो की काही तांत्रिक कारणांमुळे साइट एकल किंवा बहु ट्रान्समिशन टॉवर / पोल / बहुतेक आणि इतर संबंधित उपकरणे बसविणे, ऑपरेट करणे आणि देखभाल करणे शक्य नाही आणि म्हणून आम्ही आमच्या मोबाइल इंटरनेटवर स्थापित करू शकलो नाही. ध्रुव / टॉवर / बर्याच घटना साइटवर आणि आम्हाला साइट रद्द करणे किंवा सोडणे भाग पडते. म्हणून आम्ही टॉवर चालू ठेवू शकणार नाही. ३० जून २०२० पर्यंत हा टॉवर काढून नेणार आहोत. मात्र अद्याप पर्यंत टॉवर काढलेला नाही.
