Type Here to Get Search Results !

कंटेमेंट झोन हटविण्यावरून वादविवाद

शिरूर कासार तालुक्यातील वारणी येथील  कंटेमेंट झोन हटविण्यावरून ग्रामस्थांनी बॅरिकेडस काढून होमगार्ड शी वाद घातल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी ९ वाजता घडला. याप्रकरणी वारणी येथील २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारणी येथे एक कोरोनाग्रस्थ व्यक्ती आढळली होती. त्यामुळे गत १०ते१२दिवसापासून गावात कंटेमेंट झोन लागू करण्यात आले आहे. शिवाय ज्या लोकांच्या संपर्कात ही व्यक्ती आली होती, त्या घरातील लोकांनी स्वब देण्यास  नकार दिला.होमगार्ड कचरू उत्तम धायगुडे यांच्या फिर्यादी वरून २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
 
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.