Type Here to Get Search Results !

कोरोनाबाधीत रुग्ण संख्येत वाढ

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या वाढतच चालली आहे. गुरुवारी २७६ रुग्णांचे अहवाल दिवसभरात कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.   ग्रामीण भागातील १३८ रूग्ण.....औरंगाबाद ६, फुलंब्री ३,गंगापूर २२, सिल्लोड ३, वैजापूर ७,पैठण४,सोयगाव१२,अंभाई सिल्लोड१,स्नेहवाटिक सिडको महानगर१,वाळूज१, बजाजनगर१,फुलेनगर वडगाव१,कन्नड२,खुलताबाद१ तर मनपाच्या हद्दीतील ४३ रूग्ण , शहर प्रवेशावेळी३८  आढळले.
कोरोना बाधित ६ रुग्णांचा मृत्यू
घाटीत रुग्णालयात पाच कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यात विश्रांतीनगर येथील ४६ वर्षीय पुरूष, आविष्कार कॉलनी एन-६येथील ७५ वर्षीय पुरूष,खोकडपुरा येथील ७५ वर्षीय महिला, रोफ कॉलनी येथील ७४वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.तसेच बीड जिल्ह्यातील मोमीनपुरा येथील ६० वर्षीय पुरूष रुग्णाचा घाटीत मृत्यू झाला. तर खाजगी रुग्णालयात ५० वर्षीय पुरूष कोरोना बधितांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने कळविले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.