भंडारदरा प्रतिनिधी,नामदेव बांगर
भंडारदरा: प्रचार करण्यासाठी आलेल्या ‘अगस्ती ऋषींनी’ इथल्या मूळनिवासी आदिवासींना बऱ्याच खोट्या-नाट्या गोष्टी सांगायला सुरुवात केली होती. मात्र त्या सर्व गोष्टी गोष्टी आदिवासींना पटण्या सारख्या नव्हत्या त्यामुळे आदिवासींनी त्यांना कडवा विरोध केला गेला. आदिवासी एकत नाही म्हटल्यावर चलाख अगस्तींनी आदिवासींना आपले सोयरे सबंधून त्याने आदिवासी युवतीशी लग्न केले.
‘लोपमुंडा’ तिचे नाव. मुंडा ही लढवई आदिवासी जमात आहे. त्यामुळे अगस्तींने तिचे नाव लोपमुद्रा असे करुन इतिहासाला कलाटणी देत. आदिवासींचीच नाममुद्राच बदलून टाकली. एखाद्या जमातीची मुद्रा बदलणे सोपी गोष्ट नाही. असे परखड मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ माजी मराठी विभाग प्रा.डॉ.तुकाराम रोंगटे यांनी व्यक्त केले.ते आदिवासी दिनदर्शिका व कवि नामदेव गंभीरे यांच्या प्रेमवेल काव्यसंग्रह प्रकाशन समारंभा नंतर बोलते होते. त्यावेळी मंचावर आमदार डॉ.किरण लाहमटे, एम.एन.देशमुख राजूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब देशमुख, लिज्जत पापड समुहाचे संचालक सुरेश कोते, डॉ.रामकृष्ण पेढेकर, वनकक्षेत्रपाल अधिकारी पडवळे साहेब, बी.के.घोडे, सि.के.भांगरे, कोंडीराम पोपेरे, माणिक देशमुख उपस्थित होते. आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र पुणे व स्वप्नदूत फौंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रेमवेल या काव्यसंग्रहाविषयी बोलतांना प्रा.डॉ.रोंगटे म्हणाले की, “नामदेव गंभीरे यांची कविता समाजमन ढवळून काढणारी आहे. त्यातील एका कवितेच्या संदर्भाविषयी स्पष्टीकरण देतांना ते म्हणाले अजिंठा येथे संशोधनासाठी आलेल्या मेजर रॉबर्टला भारतीय संस्कृतीने खुनावले होते. तो उत्तम दर्जेचा चित्रकार होता. त्याला अंजिठ्याच्या पायश्याशी आदिवासी युवती ‘पारो’ भेटते. ती उत्तम नर्तिका असते. तिने विदेशी मेजर रॉबर्ट याला अजिठ्यांची इत्यंभूत माहिती दिल्यावर त्याचे रुपांतर प्रेमात होते. ते त्यांचे प्रेम कलेकले वाढत जाते. ते दोघे लग्न करण्याच्या विचारात असातांना गावकऱ्यांना मात्र मेजर रॉबर्टचे वागणे सहन झाले नाही. त्यांनी रॉबर्ट यांच्यावर एकेदिवशी हल्ला करुन त्याला भयंकर जखमी केले. आणि त्याच दिवशी रॉबर्ट यांना गाव सोडण्याची धमकी दिली. म्हंटल्यानंतर रॉबर्ट यांनी गावसोडण्यापूर्वी रात्रीतून अंजिठ्याच्या पायत्याशी आपली सोबतीन ‘पारो’ हीच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून जी झोपडी बांधली ती आजही बघायला मिळते. याला म्हणायचे प्रकृतिशी मिळन मिसळून प्रेम करणे होय. त्याच बरोबर डॉ.रोंगटे यांनी ‘प्रेमवेल’या कवितासंग्रहातील ‘आरक्षण’ कविता समजावून सांगताना म्हणाले, ‘आदिवासी समाजास घटनेनं दिलेलं आरक्षण या कवितेत कवीने हा घटक देशाच्या भूमीवरील पहिला मूळनिवासी असून त्यावेळे पासून आजपर्यंत आरक्षणाच्या माध्यमातून म्हणावा तितका विकास तर झाला नाही. पण आरक्षणच बंद करा याची चाहूल लागल्याची जाणीव झाल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे आजचे आश्रमशाळेतील शिक्षण कसे कुचकामाचे झाले आहे. आदिवासी समाजाचे उत्थानासाठी मोठी मोठी बजेट करण्यात येतात, परंतु त्याचा फायदा खरंच या समाजास झाला आहे काय? याची खंत ‘आदिवासी बांधव हो जागा’ या कवितेतून व्यक्त होत आहे.
