प्रतिनिधी नामदेव बांगर
भंडारदरा: बाळासाहेब विखे पाटील यांनी गरीबांचे दुःख आणि यातना समजून घेवून शेतकऱ्यांना एकत्र आणले व सहकारांशी जोडले गेले. देशात जेव्हा ग्रामीण शिक्षणाबाबत फारशी चर्चा होत नव्हती, तेव्हा डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेद्वारे खेड्यातील तरुणांना सक्षम बनवण्याचे काम केले. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी खेड्यातील तरुणांचे शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी काम केले. गरीबांचे हृदय जाणणारा नेता असल्याचे मत जनसेवा फौंडेशन संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय शेंडी, भंडारदारा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वैशाली रोकडे यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त वृक्षरोपणाचा
कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी चिंचोडी गावचे सरपंच संदिप मेंगाळ, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.अनिल डगळे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.नामदेव बांगर,प्रा.अर्चना बच्छाव, परीक्षा विभाग अधिकारी प्रा.नईम खाटीक, उपप्राचार्य प्रा.जनार्दन वाघ, दगडू वाघमारे, बहिरु इदे, रामनाथ इदे, शंकर मधे, सुरेश धनगर, संतोष गाडगे, तुकाराम गांगड, सुनिल भांगरे, सोमनाथ वाघमारे, विकास सुकटे, अकाश संगारे, दिनेश वाघमारे, सुरेश बांडे, सुनिल मधे आदि उपस्थित होते.पुढे बोलतांना डॉ.वैशाली रोकडे मॅडम म्हणाल्या की, “बाळासाहेब विखे पाटील यांचे कार्य नेहमीच आजच्या पिढीला प्रेरणा देणारे आहे. मागील काही महिण्यांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचे ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले. या संपूर्ण आत्मचरित्राबद्दल डॉ.वैशाली रोकडे मॅडम यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी व रासेयो स्वयंसेवक माहिती ऐकण्यात भारावून गेली होती. महाविद्यालयीन उभारणीसाठी दगडू वाघमारे बाबा यांनी संस्थेला जागा देऊन आदिवासी गोर-गरीब यांच्या शिक्षणासाठी योगदान दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेविका योगिता सोनवणे, जयश्री धनगर यांनी आपली मते व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनसेवा फौंडेशनचे सेक्रेटरी डॉ.हरिभाऊ आहेर यांचे योगदान लाभले.
