जागतिक आदिवासी दिन साजरा-
August 13, 2020
0
अहमदनगर : अकोले तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने जागतिक मूलनिवासी आदिवासी दिनाच्या निमित्ताने अकोले कार्यलयात आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा,राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच मौजे -बिताका येथे आदिवासी कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, मनोज अस्वले, बाळासाहेब बांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मंडळ कृषी अधिकारी मनोज अस्वले यांनी उपस्थित ग्रामस्त यांना जागतिक आदिवासी दिनाचे महत्व विशद करून सांगितले. यावेळी कृषी पर्यवेक्षक भगवान वाकचौरे, अशोक धुमाळ, शिवा राऊत, पाडवी, कृषी सहाय्यक यशवंत खोकले, राजाराम साबळे, संतोष साबळे, नारायण घुले मंगल ठोकळ, रोहिणी कडलक , देवराम पेढेकर आदीची उपस्थिती होती.
Tags
