नांदेड : विष्णुपुरी प्रकल्प सातव्या तुडुंब झाल्याने धरणातील चार दरवाजे उघडून १२८.२ क्यूसेक्स ने विसर्ग करण्यात आले. त्याचवेळी इसापूर धरण ही ७२.२% भरले आहे.या पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास धरणाच्या वरच्या बाजूने नदीपात्रात विसर्ग सोडला जाऊ शकतो. त्यामुळे वित्तहानी होऊ नये म्हणून नदीकाठच्या गावांनी दक्षता घ्यावी,असा इशारा किनवटच्या तहसीलदारांनी दिला आहे.
