Type Here to Get Search Results !

आमदार डॉ.लहामटे यांच्या हस्ते नुकसानभरपाई चा दिला धनादेश.

भंडारदरा प्रतिनिधी,
 डॉ. कुंडलिक पारधी
अकोले तालुक्यातील पुरुषवाडी  येथील नुकतीच घडलेली घटना. वाळू पोपट कोंडार यांच्या जनावरांच्या गोठ्यात शिरून वाघाने हल्ला केला होता. या हल्ल्यात जनावरे जागीच ठार झाली होती.त्या कुटुबीयांना नुकसानभरपाई  म्हणून वनखात्याच्या वतीने आमदार डॉ. किरण लहामटे  यांचे हस्ते धनादेश देण्यात आला वाळू कोंडार यांच्या घराच्याच बाजुला गोठा आहे. रात्री शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज येताच कोंडार यांचे कुटुंबिय जागे  झाले आणि गोठ्यात कडे धावले माणसाचा आरडाओरडा ऐकून वाघ पळाला पण जनावरे मृत्यू पावली होती. त्यामुळे श्री कोंडार याना नुकसान भरपाई वन विभागाने द्यावी, अशी मागणी आमदार डॉ. लहामटे यांचे कडून करण्यात आली होती. आज सकाळी वन विभागाने आमदार साहेबांच्या हस्ते वाळू कोंडार यांना  53,680 रुपयांचा धनादेश  सुपूर्त करण्यात आला. याप्रसंगी अकोले,चे वन क्षेत्रपाल जे.के.गोंदके, राजूरचे वनपाल मधुकर चव्हाण व वनरक्षक युवराज परते आदीजन उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.