प्रतिनिधी - नामदेव बांगर
भंडारदरा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रथमच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीशिवाय स्वातंत्र्यदिन भंडारदरा परिसरात साजरा करण्यात आला. भारताला स्वातंत्र्य मिळानंतर पहिल्यांदा शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनविना स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची वेळ आली. यंदा शाळांच्या मैदानाऐवजी घरात बसूनच विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळा-महाविद्यालयामध्ये फिरकले नाहीत.
अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद, शासकीय आश्रम शाळा, कायमविना आनुदानित आश्रम शाळा, महाविद्यालयामध्ये महाविद्यालयामध्ये दरवर्षी स्वतंत्र्य दिनानिमित्त सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. लहान मुलांमध्ये मोठी उत्सुकता असते, परंतु यंदा कोरोनाच्या संसर्गाच्या महामारीमुळे गेल्या पाच महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत.
१५ ऑगस्ट २०२० ला भारतीय स्वातंत्र्याचा ७३ वा वर्धापन दिनानिमित्त शाळा महाविद्यालयामध्ये ८ वाजून ३५ मिनिटांपूर्वी ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात यावा, तसेच कार्यक्रमांतर्गत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, शालेय समिती सदस्यांना मुभा देण्यात आली होती. त्यामूळे भंडारदरा परिसरातील शाळा, महाविद्यालयामध्ये विद्यार्थी आले नाहीत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालये गेली पाच महिण्यांपासून बंद आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळानंतर पहिल्यांदा शाळा-महाविद्यालयांत विद्यार्थ्यांनविना स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची वेळ आली. गेली कित्येक वर्षांपासून भंडारदरा परीसरात स्वातंत्र्यदिन तसेच प्रजासत्ताकदिनी मुले गावातून प्रभात फेरी काढत असतात. हातामध्ये तिरंगा फडकवीत भारतमातेचा जयघोष करत असतात. मात्र यावर्षी मुलांशिवाय स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची वेळ शाळा महाविद्यालयांवर आली.
