Type Here to Get Search Results !

अंघोळीच्या गोळीच्या पोरांनी केले कळसुबाई शिखर स्वच्छ आणि प्लास्टिक मुक्त !!


भंडारदरा प्रतिनिधी, नामदेव बांगर
अहमदनगर : बारी गावाच्या सरपंचांना सोबत घेऊन कळसुबाई शुक्रवार प्लास्टिक बंदी करण्याचा निर्धार. दहावी नापास असलेल्या अंघोळीच्या गोळीचा तालुकाप्रमुख श्री बाळू खाडे या तरुणाने केले कळसुबाई शिखर स्वच्छ व प्लास्टिक मुक्त ..!!
 नुकताच रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी च्या ३१ डिसेंबरच्या ट्रेक मध्ये अंघोळीच्या गोळीचे श्री. नामदेव बांगर, श्री. बाळू खाडे, श्री. दिनेश वाघमारे यांची भेट घडली होती, बांगर सर आणि बाळूचे कार्य खूप छान आहे.
भंडारदरा, महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच शिखर कळसुबाई याठिकाणी आल्यावर निसर्गरम्य वातावरणाबरोबच पर्यावरण आणि परिसर स्वच्छ दिसत असेल ते फक्त अंघोळीच्या गोळीच्या बाळू खाडे या तरुणामुळे. गेल्या तीन वर्षांपासून बाळू आठवड्यातून एकदा किंवा वेळ मिळेल तेव्हा कळसुबाई शिखर स्वच्छ करण्यासाठी जात असतो. दोन दिवसांपूर्वी बाळू व अंघोळीच्या गोळीचे सहकारी सोबत घेत कळसुबाई शिखर परीसर स्वच्छ करण्यासाठी निघाले असतांना निसर्ग कवी तानाजी सावळे व त्यांचे सहकारी जालिंदर आडे, सीताराम जाधव, जयंत पटेकर, जयेश पटेकर, युवराज फुलारे, शितल पाटील यांची भेट कळसुबाई शिखरावर झाली. यावेळी बाळू खाडे व बारी गावचे सरंपच तुकाराम खाडे कळसुबाई शिखराची स्वच्छता करत असल्यामुळे निसर्ग कवी तानाजी साबळे यांची टिम प्रभावित झाली. बाळू खाडे यांच्याबरोबर कळसुबाई शिखर स्वच्छ करण्यास मदतीला धावून आले.त्यांनी हि प्लास्टिक चा वापर टाळावा याबाबत आवाहन केले.
 बाळू आठवड्यातून ४-५ दिवस कळसुबाई शिखर मंदिर परिसर स्वच्छ करतो, जिथे एकदा शिखर सर करायला अनेकांच्या जीवावर येते तिथे हा पठ्या दिवसातून ३ वेळा वरखाली करत असतो, कमी शिक्षित असला तरी अंघोळीच्या गोळीच्या कार्याला प्रेरित होऊन कळसुबाई शिखरावर प्लास्टिक बंदी साठी स्थानिक पातळीवरील प्रशासन आणि अंघोळीच्या गोळीचा मेळ घेतला हे नक्कीच कौतुकास्पद आहे.बाळू करू शकतो तर आपण का नाही ?? प्लास्टिक ला नाही म्हणा आणि प्रदूषण कमी करण्यासाठी जबाबदार नागरिक बना!!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.